३६ वे पक्षीमित्र संमेलन
३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सालिम अली यांच्या भव्य रांगोळीचे अनावरण करतांना मान्यवर.
३६ वे पक्षीमित्र संमेलन
सांगली येथील ३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. यावेळी उद्घाटक श्री. राजेंद्र केरकर, प्रमुख उपस्थिती डॉ एरीक भरुचा, म.प. चे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, आयोजक संस्थेचे श्री. शरद आपटे, स्वागताध्यक्ष डॉ. रवींद्र व्होरा व डॉ. गजानन वाघ.
३६ वे पक्षीमित्र संमेलन
श्री अजितकुमार उर्फ पापा पाटील यांना संमेलनाध्यक्ष पदाचा कार्यभार म.प. चे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर व आयोजक संस्थेचे श्री. शरद आपटे यांनी संस्थेचा ध्वज देऊन सोपविण्यात आला
३६ वे पक्षीमित्र संमेलन
श्री. शरद आपटे यांचे पक्षिगान .. का? केव्हा? कोठे? या पुस्तकाचे प्रकाशन करतांना संमेलनाचे उद्घाटक श्री. राजेंद्र केरकर, म.प. चे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, कार्यवाह प्रा. डॉ. गजानन वाघ आणि लेखक श्री. शरद आपटे.
३६ वे पक्षीमित्र संमेलन
संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी निसर्गकट्टा, अकोला तर्फे तयार केलेली पक्षी विषयावरील दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी या दिनदर्शिकेच्या निर्मितीमध्ये योगदान देणारे सर्व पक्षिमित्र उपस्थित होते.
३६ वे पक्षीमित्र संमेलन
सांगली जिल्हा पक्षी मार्गदर्शिका या पुस्तकाचे प्रकाशन संमेलनात करण्यात आले. हे पुस्तक संमेलनात सहभागींना विनामूल्य देण्यात आले.
३६ वे पक्षीमित्र संमेलन
संमेलनाच्या समारोप प्रसंगी मंचावर उपस्थित प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. बैजू पाटील, प्रा. डॉ. निनाद शाह, म.प. चे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, प्रा. डॉ. गजानन वाघ, श्री. शरद आपटे, डॉ. नंदिनी पाटील इत्यादी मान्यवर

विशेष उल्लेखनीय

३६ वे पक्षीमित्र संमेलन (सांगली)

३६ वे पक्षीमित्र संमेलन (सांगली)


महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीर

पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार श्री. दिगंबर गाडगीळ यांना जाहीर

महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीर

पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार श्री. दिगंबर गाडगीळ यांना जाहीर

अमरावती: गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था "महाराष्ट्र पक्षिमित्र" तर्फे देण्यात येणाऱ्या २०२३ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार नाशिक येथील श्री. दिगंबर गाडगीळ यांना जाहीर करण्यात आला. इतर पुरस्कारांपैकी पक्षी संशोधन पुरस्कार सालिम अली सेंटर फॉर ऑर्निथालॉजी कोइम्बतुर येथील पक्षी शास्त्रज्ञ डॉ. शिरीष मंची यांना, पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार अमरावती येथील प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी श्री. राघवेंद्र नांदे यांना तर पक्षी जनजागृती पुरस्कार अकोला येथील श्री. अमोल सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. पक्षी सबंधित विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून यामध्ये दरवर्षी चार पुरस्कार देण्यात येत असतात. या पुरस्काराचे वितरण ३६ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार असून यावर्षी महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सांगली येथे २३-२४ डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी कळविली आहे.


 

स्व. अण्णासाहेब वझे स्मृती स्व. प्रकाश गोळे महाराष्ट्र पक्षिमित्र शिष्यवृत्ती

Late Annasaheb Waze memorial

Late Prakash Gole Maharashtra Pakshimitra Fellowship

 

महाराष्ट्रातील तरुण पक्षी अभ्यासकास दरवर्षी स्व. प्रकाश गोळे महाराष्ट्र पक्षिमित्र शिष्यवृत्ती (Late Prakash Gole Maharashtra Pakshimitra Fellowship) देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत किमान ६ महिने ते १ वर्ष कालावधीत एखाद्या पक्ष्यावर किंवा पक्षी अधिवासात अभ्यास करून अहवाल सादर करावा लागेल. या शिष्यवृत्ती अंतर्गत रु. ११०००/- आर्थिक सहाय्य देण्यात येईल. (२०२३-२४ या वर्षातील शिष्यवृत्ती स्व. अण्णासाहेब वझे यांचे स्मृती प्रित्यर्थ श्री. उदय वझे, अकोला यांनी प्रायोजित केली आहे.)

नियमावली –

१. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा. किमान १२ वी पास, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असल्यास उत्तम. वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे ( + २ वर्षे )

२.  अभ्यास/ संशोधन प्रस्ताव विहित नमुन्यात, विहित कालावधीत महाराष्ट्र पक्षिमित्रकडे सादर करण्यात यावा. प्रस्ताव इंग्रजी किंवा मराठी मध्ये असावा.

३.  संशोधन प्रकल्प महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील असावा. संरक्षित क्षेत्रातील अभ्यास प्रकल्पासाठी रीतसर परवानगी घेण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल.  

४.  संशोधन / अभ्यास क्षेत्र हे पक्षी विषयक संशोधन, संवर्धन, सर्वेक्षण अथवा जनजागृती सबंधित असू शकेल.

५.  अभ्यास/ संशोधन प्रकल्पाचा कालावधी ६ महिने ते १ वर्ष इतका असावा.

६.  प्रकल्प सादर करतांना शाळा महाविद्यालयाचे किंवा मार्गदर्शकाचे शिफारसपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.

७.   पहिला अंतरिम अहवाल ६ महिन्यानंतर सादर केल्यानंतर शिष्यवृत्ती ५० टक्के रक्कम अदा करण्यात येईल. उर्वरित रक्कम व प्रमाणपत्र  संपूर्ण अहवाल सादर केल्यानंतर व समितीने मंजूर केल्यानंतर पुढील संमेलनात देण्यात येईल.

८.  प्राप्त प्रस्तावामधून एका उत्कृष्ट प्रस्तावाची निवड,  महाराष्ट्र पक्षिमित्रच्या निवड समिती कडून करण्यात येईल व तसे संबंधिताना कळविले जाईल.

९.  अभ्यास प्रकल्पावर आधारित शोध निबंध, लेख, सादरीकरण इ. मध्ये “महाराष्ट्र पक्षिमित्र” चा उल्लेख करणे अनिवार्य राहील. प्रकल्पावर आधारित लेख “पक्षिमित्र” अंकासाठी लिहून पाठवावा लागेल तसेच या विषयावरील सादरीकरण संमेलनात करण्यात यावे.

१०. महाराष्ट्र पक्षिमित्र कार्यकारिणी सदस्य, सल्लागार मंडळ तसेच पक्षिमित्र संपादक मंडळ यांचे कुटुंबीय या शिष्यवृत्ती साठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. 

शिष्यवृत्तीचे प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०२३ आहे. आपले प्रस्ताव महाराष्ट्र पक्षिमित्रच्या पत्त्यावर, कार्यवाह, महाराष्ट्र पक्षिमित्र, व्दारा प्रा.डॉ. गजानन वाघ, ६३, अरण्यार्पण, समता कॉलनी, कठोरा रोड, व्हीएमव्ही पोस्ट, अमरावती ४४४६०४ किंवा Scan केलेला संपूर्ण प्रस्ताव PDF स्वरुपात संस्थेचा इमेल- pakshimitra@gmail.com वर पेपरलेस सुद्धा पाठविता येईल. अर्जाचा नमुना व शिष्यवृत्ती सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.


 

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२३

पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धक, जनजागृती, पक्षी उपचार, सेवा व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती / संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्धेशाने २०१९ पासून महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे पुरस्कार देण्यात येत आहेत. यावर्षी २०२३ सालासाठी खालील पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

१. महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार
२. महाराष्ट्र पक्षिमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार
३.  महाराष्ट्र पक्षिमित्र पक्षी संशोधन पुरस्कार
४. महाराष्ट्र पक्षिमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार


याबाबत संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.


महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेचे उद्दिष्ट

'मिळून सारेजण करु व्दिजगण रक्षण!' या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे पक्षांचे संरक्षण करणे आणि महाराष्ट्रातील सर्वदूर पसरलेल्या पक्षीमित्रांचे संघटन व त्यांचे कार्य एकत्रितपणे पुढे आणणे.


 

महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेचे कार्य 

पक्षीमित्र संमेलने, पक्षी अभ्यास, पक्षी गणना, पक्षीमित्र पुरस्कार इ. कार्यक्रम आयोजित करुन पर्यावरणाचा प्रचार, प्रसार, संवर्धन, संरक्षण करणे.


Support us

Maharashtra Pakshimitra has been striving to protect Birds of Maharashtra since the past 20 years. Being a non-profit NGO, we rely on your help in securing funds. Please contribute.


 

(01.04.2018 ते  31.03.2021)

डॉ. जयंत सुधाकरराव वडतकर
पद : अध्यक्ष
पत्ता : ४२, ग्रीनपार्क कॉलनी, आशियाड कॉलनीजवळ, शेगाव रोड, अमरावती, जिल्हा अमरावती ४४४६०४
मोबाईल क्र. : ९८२२८७५७७३
ई-मेल : jaywadatkar@rediffmail.com

 

डॉ. राजू मोतीरामजी कसंबे
पद : कार्याध्यक्ष
पत्ता : २०५, त्रिमूर्ती अपार्टमेंट, बोरकर गल्ली, टिळक विद्यालय जवळ, टिळकनगर, डोंबिवली, (पु.),ठाणे ४२१ २०१
मोबाईल क्र. : ९००४९२४७३१
ई-मेल : raju.bnhs@gmail.com

 

प्रा. डॉ. सुधाकर कुऱ्हाडे
 पद : संघटक
पत्ता : रिद्धीसिद्धी, विद्या कॉलनी, पाईप लाईन रोड, अहमदनगर ४१४ ००३
मोबाईल क्र. : ९८५०२९१३२४
ई-मेल : sudhakarkurhade@gmail.com

 

प्रा. डॉ. गजानन वाघ
पद : कार्यवाह
पत्ता : २४, समता कॉलनी, कठोर रोड, अमरावती, जिल्हा अमरावती ४४४ ६०४
मोबाईल क्र. : ९८२२२०४०७०
ई-मेल : gajuwagh252424@rediffmail.com

 

श्री. शरद दत्त आपटे
पद : सहकार्यवाह
पत्ता : उशःकाल, ऑफ डॉ. आंबेडकर रोड, सांगली ४१६ ४१६
मोबाईल क्र. : ९८९०३८४४००
ई-मेल : aptesharad@yahoo.co.in /sdapte56@gmail.com

 

श्री. अनिल माळी
पद : सहसंघटक
पत्ता : "नेस्ट", त्रिवेणी रो बंगलो, वृंदावन कॉलनी,पाईप लाईनरोड, आनंदवल्ली,गांगणापूर रोड, नाशिक ४२२०१३
मोबाईल क्र. : ९८५०८१८६४४
ई-मेल : anilrmali@yahoo.co.in

 

प्रा. डॉ. निनाद शहा
पद : सदस्य
पत्ता : विहंगम, ४/२ विद्यानगर, पाथरूट चौक, सोलापूर जि. सोलापूर ४१३००३
मोबाईल क्र. : ९४२२४५९९१५
ई-मेल : ninadshah1950@yahoo.co.in

 

श्री. किशोर गठडी
पद: सदस्य
पत्ता: १७ व्यंकटेश कॉलनी, गारखेडा परिसर, औरंगाबाद ४३१००५
मोबाईल क्र.: ९४२२२०२६२८
ई-मेल: kishorguts@rediffmail.com

 

श्री. दिलीप वीरखडे
पद: सदस्य
पत्ता: अमलताश, खोब्रागडे फेब्रीकेशन जवळ, वर्धा - ४४२१०५
मोबाईल: 7775883861
इमेल: dilipvirkhade@gmail.com


श्री. श्री. अविनाश सुर्यकांत कुबल  
पद: सदस्य
पत्ता: ८०३, गुलमोहर, सुंदरवन पार्क, समता नगर, ठाणे, (प) - ४००६०४  
मोबाईल: 9324238031
इमेल: avinashkubal@gmail.com

 

कु. रुपाली मढवी   
पद: सदस्य
पत्ता: 302, Jigna Apartment, M. J. Road, Gavanpada, Mulund (E) Mumbai 400081  
मोबाईल: 9869559922

महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे कार्य १९८१ साली श्री. प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने चालू झाले. १९९८ साली संस्था नोंदणीकृत झाली. पक्षीमित्रांचे संघटन, विचारांची देवाण घेवाण, विविध पक्षी जातींचे संरक्षण, संवर्धन, प्रचार, प्रसार, जनजागृती इत्यादी विषयात संस्था यशस्वीपणे कार्य करत आहे.

आमचे काही ठळक कार्यक्रम:

  • महाराष्ट्रातील पक्षी निरिक्षकांना एकत्र आणणे
  • महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन
  • प्रादेशिक पक्षीमित्र संमेलन
  • पक्ष्यांचा अभ्यास
  • महापक्षी गणना
  • पक्षी संवर्धन
  • पक्षांबद्दल जागरूकता निर्माण करणे
  • पक्षीमित्र पुरस्कार

महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे कार्य १९८१ साली श्री. प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने चालू झाले. १९९८ साली संस्था नोंदणीकृत झाली. पक्षीमित्रांचे संघटन, विचारांची देवाण घेवाण, विविध पक्षी जातींचे संरक्षण, संवर्धन, प्रचार, प्रसार, जनजागृती इत्यादी विषयात संस्था यशस्वीपणे कार्य करत आहे.

आज आपणासमोर पर्यावरणाचे प्रश्न गंभीरपणे उभे आहेत. त्यामुळेच अनेक पक्षी प्रजाती संकटग्रस्त बनल्या आहेत. काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

पक्षीमित्र चळवळ अधिक भक्कम करुन आपण सर्वांनी एकत्रितपणे पक्षी संरक्षण संवर्धनासाठी काम सुरु केल्यास त्यात नक्कीच यश प्राप्त होईल.

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना मुख्यत्वे महाराष्ट्रातील सर्वदूर पसरलेल्या पक्षीमित्रांचे संघटन व त्यांचे कार्य एकत्रितपणे पुढे आणण्याचा प्रयत्न करत असते.

पक्षीमित्र संमेलने, पक्षी अभ्यास, पक्षी गणना, पक्षीमित्र पुरस्कार इ. कार्यक्रम आयोजित करुया ज्यायोगे प्रचार, प्रसार, संवर्धन, संरक्षण इ. विविध क्षेत्रात आपण यश मिळवू.

हीच वेळ आहे आपण सर्वजण एकदिलाने महाराष्ट्र पक्षीमित्रला बळकट बनवण्याची, महाराष्ट्र पक्षीमित्रचे सदस्य व्हायची.

मिळून सारेजण करु व्दिजगण रक्षण!