पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धक, जनजागृती, पक्षी उपचार, सेवा व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती / संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्धेशाने २०१९ पासून महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे पुरस्कार देण्यात येत आहेत. यावर्षी २०२३ सालासाठी खालील पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

१. महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार
२. महाराष्ट्र पक्षिमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार
३.  महाराष्ट्र पक्षिमित्र पक्षी संशोधन पुरस्कार
४. महाराष्ट्र पक्षिमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार

याबाबत संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित

पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धन, जनजागृती, पक्षी उपचार, पक्षी सेवा व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने २०१९ पासून महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे पुरस्कार देण्यात येत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार, पक्षी संशोधन पुरस्कार, पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार व पक्षी जनजागृती पुरस्कार अशा एकूण चार पुरस्कारांचा समावेश आहे. जीवन गौरव पुरस्कार हा जेष्ठ व्यक्तीस आणि इतर तीन पुरस्कार हे व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येतील. यासाठी पुरस्कार राशी अनुक्रमे रु. ५०००/-,  रु. २५००/-,  रु. २५००/- व रु. २५००/- इतकी रक्कम, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्कारचे स्वरूप राहील.

जीवन गौरव पुरस्कार हा स्व. रमेश लाडखेडकर, स्मृती “महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार-२०२३  असे पुरस्काराचे नाव असेल. दीर्घकाळ पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन, पक्षीविषयक जनजागृती यासाठी कार्य केलेल्या व वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ व्यक्तीच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येईल.

पक्षी संशोधन पुरस्कार - स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती “महाराष्ट्र पक्षी संशोधन पुरस्कार – २०२३ असे पुरस्काराचे नाव असेल. हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, संशोधन, आणि त्यातून संवर्धन असे कार्य करणाऱ्या या क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येईल. पीएचडीचे संशोधन, प्रकल्पातील कार्य, संशोधन निबंध, प्रकाशित साहित्य, पेपर, रिपोर्ट, पक्षी नोंदणी अहवाल ई. चा विचार करण्यात येईल.

श्री. अनिल बहादुरे यांचे तर्फे प्रायोजित पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार-“महाराष्ट्र पक्षिमित्र, पक्षी संशोधन पुरस्कार -२०२३ असे पुरस्काराचे नाव असेल. हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन, जखमी पक्षी उपचार व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येईल.

पक्षी जनजागृती पुरस्कार-  रामभाऊ शिरोडे (वाणी) स्मृती, महाराष्ट्र पक्षिमित्र, जनजागृती पुरस्कार -२०२३  असे पुरस्काराचे नाव असेल. हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, आणि त्यातून जनजागृती आणि संवर्धन असे कार्य करणाऱ्या या क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येईल.

दरवर्षी प्रत्येकी एक पुरस्कार देण्यात येईल आणि  गरज पडल्यास विभागून देण्यात येईल (जीवन गौरव सोडून). चारही पुरस्कार त्या पुढील संमेलनात प्रदान करण्यात येतील. पुरस्कारासाठी निवड करतांना संस्था करिता म. प. संलग्नित संस्थेचा तसेच व्यक्ती साठी महाराष्ट्र पक्षिमित्रचे सभासद, पक्षिमित्र संमेलनामधील सहभाग, पक्षिमित्र चळवळीतील सहभाग ई. चा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल. वरील पुरस्कारांसाठी स्वतः किंवा इतर व्यक्ती किंवा संस्था मार्फत प्रस्ताव सादर करता येतील. एखाद्या गटात योग्य प्रस्ताव प्राप्त न झाल्यास पुरस्कार जाहीर करण्यात येणार नाही. महाराष्ट्र पक्षिमित्र कार्यकारिणीतील सदस्य किंवा त्यांचे कुटुंबीय या पुरस्कारासाठी अर्ज करू शकणार नाहीत, किंवा त्यांना पुरस्कार देण्यात येणार नाही. पुरस्कारासाठी प्रस्ताव दि. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्र पक्षिमित्रच्या पत्त्यावर, कार्यवाह, महाराष्ट्र पक्षिमित्र, व्दारा प्रा.डॉ. गजानन वाघ, ६३, अरण्यार्पण, समता कॉलनी, कठोरा रोड, व्हीएमव्ही पोस्ट, अमरावती ४४४६०४ किंवा Scan केलेला संपूर्ण प्रस्ताव PDF स्वरुपात संस्थेचा इमेल- pakshimitra@gmail.com वर पेपरलेस सुद्धा पाठविता येईल. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्या दरम्यान पुरस्कारार्थी यांची नावे जाहीर करण्यात येतील. अर्जाचा नमुना व पुरस्कारांची सविस्तर माहिती संस्थेची वेबसाईट www.pakshimitra.org येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहित महाराष्ट्र पक्षिमित्रचे  अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.