महाराष्ट्र पक्षीमित्र ही संस्था सन १९८१ साल पासून महाराष्ट्रात पक्षी संवर्धन संरक्षणासाठी काम करत आहे. प्रतिवर्षी पक्षीमित्र संमेलन, महा पक्षी गणना, संस्थेचे मुखपत्र 'पक्षीमित्र', पक्षी संवर्धन निधी इत्यादी प्रकल्प राबवत आहे. संस्थेच्या प्रकल्पाला आपण सुद्धा देणगी देऊन हातभार लावावा ही विनंती.

सर्व देण्ग्या 80G अन्वये सवलत पात्र

खालील दोन प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता आहे.

पक्षी संवर्धन निधी

२५ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात गोंदिया येथील सारस पक्षांच्या संवर्धनासाठी व त्याच्या घरट्याच्या अधिवासाच्या संरक्षणसाठी पाच लाख रुपयाचा निधी उभा करण्याचे ठरवण्यात आले. हा निधी आता पर्यंत फक्त १,४०,०००/- इतकाच जमला आहे. आता आपण हा 'पक्षीसंवर्धन निधी' या नावाने पुढे नेत आहोत. पाच लाख एवढा निधी जमवण्याचे ध्येय्य आहे. जमलेले पैसे बॅंकेत ठेवले आहेत. या पैशातून येणारे व्याज प्रतिवर्षी आपण एका पक्षी संवर्धन प्रकल्पाला देणार आहोत. प्रकल्पाची निवड कार्यकारी मंडळ करेल.

आपण सुद्धा सदर "पक्षी संवर्धन निधी" साठी आपल्या परीने देणगी देऊन हातभार लावावा.

त्रैमासिक अंक निधी

महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे मुखपत्र त्रैमासिक अंक 'पक्षीमित्र' हा आपण दर तीन महिन्यांनी प्रकाशीत करत असतो. या अंकाला छपाई व पोस्टेज मिळून वार्षीक २५,०००/- ते ३०,०००/- रुपये खर्च येतो. संस्थेचे नियमीत उत्पन्न काहीच नाही त्यामुळे हा अंक परवडत नाही. पक्षीमित्र संस्थेच्या व पक्षी संवर्धन संरक्षण कार्यात या अंकाची अत्यंत आवश्यकता आहे. याच साठी हा अंक असाच चालू ठेवावा असे वार्षीक सर्वसाधारण सभेत ठरवण्यात आले आहे. याच्या खर्चासाठी त्रैमासिक अंक निधी उभा करण्याचे ठरवण्यात आले आहे. आपण सुद्धा या अंकासाठी देणगी देऊन हातभार लावावा ही नम्र विनंती.