वर्ष – १६ वे. अंक – ३ रा. १ एप्रिल २०२६. पाने २४.
पक्षिमित्र अंक
इराण – इस्राईलच्या युद्धझळा भारतीयांना जाणवत आहेत. वाढती महागाई, पेट्रोल, गॅस टंचाई हे त्याचे सध्याचे रूप. ‘भांडवलशाही मानसिकतेचे लोक जगाला तिसऱ्या विश्वयुद्धाकडे ढकलत आहेत’ अशी शंका तज्ञ व्यक्त करत आहेत.
पक्षीजगताचा विचार करता, महाराष्ट्रामध्ये होर्मूझ मार्गे सेंट्रल एशिया “फ्लायवे” ने कितीतरी पक्षी स्थलांतर करून येतात. पश्चिम आशियातील हा भाग स्थलांतरित पक्षांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. ज्यावर युद्धाचे गंभीर परिणाम दिसत आहेत. युद्धातील स्फोट धूर, आगीचे लोळ यामुळे पक्षांच्या मार्गक्रमणात अडथळे निर्माण होतात. रात्रीदेखील मोठ्या प्रमाणात पक्षी स्थलांतर करत असतात. त्यावेळी होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे, आगीमुळे पक्षांची दिशाभूल होते. तीव्र अशा प्रकाशझोतामुळे ते त्यांची नियोजित वाट चुकतात.
प्राणिमात्रांना देशकालाच्या मानवनिर्मित सीमा कळत नाहीत. ते “अवघे विश्वची आमचे घर” ह्या उक्तीला सार्थ करतात. पक्षी, ज्यांचे जगणे स्थलांतरावर अवलंबून आहे ते या सगळ्या परिस्थितीत भरडले जातात.
या सगळ्यांचा विचार या युद्ध प्रसंगी करणे गरजेचे ठरते.
– श्री. किरण मोरे
संपादक, पक्षीमित्र
३८ व्या संमेलनांतील काही निवडक छायाचित्रे
‘पक्षिमित्र पुरस्कार’ (२०२४) जाहीर
गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था “महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या २०२४ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार पंढरपूर येथील श्री. गोविंद रघुनाथ सबनीस यांना जाहीर करण्यात आला.
Maharashtra Pakshimitra
Who we are and what we do

The beginning
१९८१ साली श्री. प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे कार्य चालू झाले.

Newsletter
पक्षिमित्र – महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे त्रैमासिक मुखपत्र. प्रथम अंक १९९३ मध्ये प्रकाशित करण्यात आला.

Pakshimitra Sammelan
प्रतिवर्षी महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे संमेलन नोव्हेंबर ते फ़ेब्रूवारी या कालावधीत महाराष्ट्रात कोठेतरी भरते.

Bird Rescue
पक्षीमित्र मदत / बचावकार्य / Bird Rescue. District wise Contact Bird Rescue (Pakshimitra)

Bird census
सन २०१० पासुन संस्थेच्या वतीने महापक्षी गणनेचे आयोजन करण्यास सुरूवात झाली. सर्वसाधारण पणे जानेवारी महीन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये ही गणना घेण्यात येते.

Fellowships
महाराष्ट्रातील तरुण पक्षी अभ्यासकास दरवर्षी स्व. प्रकाश गोळे महाराष्ट्र पक्षिमित्र शिष्यवृत्ती (Late Prakash Gole Maharashtra Pakshimitra Fellowship) देण्यात येणार आहे.
इतर समविचारी लोकांना जोडून घ्या
तसेच आपल्या परिचयातील ज्या व्यक्तींना महाराष्ट्र पक्षिमित्र चे आजीवन सभासदत्व घ्यावायचे आहे, त्यांना आपण खालील लिंक पाठवू शकता.












