Skip to content

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार २०२५ (प्रस्ताव आमंत्रित)

पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धन, जनजागृती, पक्षी उपचार, सेवा व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती/ संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने २०१९ पासून महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे पुरस्कार देण्यात येत असतात. त्यानुसार २०२५ या वर्षासाठी खालील पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तिथी – ३० सप्टेंबर २०२५  

पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कारासाठी भरावयाचा अर्जाचा नमुना (व्यक्ती करिता)

महाराष्ट्र पक्षीमित्र पुरस्कारासाठी भरावयाचा अर्जाचा नमुना (सबंधित मुद्द्यातील माहिती अपेक्षित) (व्यक्ती आणि संस्था करिता)

महाराष्ट्र पक्षीमित्र पक्षी साहित्य  पुरस्कारासाठी भरावयाचा अर्जाचा नमुना (व्यक्ती करिता)

या पुरस्काराची माहिती तथा नियम व अटी पुढीलप्रमाणे.

महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार

स्व. रमेश लाडखेडकर स्मृती “महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार’-२०२५ असे पुरस्काराचे नाव असेल. दीर्घकाळ पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन, पक्षीविषयक जनजागृती यासाठी कार्य केलेल्या जेष्ठ व्यक्तीच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येईल. यासाठी वयाची किमान ६० वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येईल. महाराष्ट्र पक्षिमित्र चे सभासद, पक्षिमित्र संमेलनामधील सहभाग, पक्षिमित्र चळवळीतील सहभाग ई. चा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल. पुरस्कार राशी रु. ५०००/- प्रमाणपत्र, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप राहील. हा पुरस्कार विदर्भ पक्षिमित्र मंच, व्दारा. डॉ. अनिल पिंपळापुरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे.  

महाराष्ट्र पक्षिमित्र संशोधन पुरस्कार

स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती “महाराष्ट्र पक्षिमित्र संशोधन पुरस्कार –२०२५ असे पुरस्काराचे नाव असेल. हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, संशोधन, आणि त्यातून संवर्धन असे कार्य करणाऱ्या या क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येईल. पीएचडीचे संशोधन, प्रकल्पातील कार्य, संशोधन निबंध, प्रकाशित साहित्य, पेपर, रिपोर्ट, पक्षी नोंदणी अहवाल ई. चा विचार करण्यात येईल. पुरस्कार राशी रु. २५००/- ,  प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप राहील. हा पुरस्कार स्व.डॉ.जी.एन.व्ही. मेमोरियल मेडल फंड तर्फे स्व. डॉ. जी. एन. वानखेडे यांचे विद्यार्थ्यांकडून प्रायोजित करण्यात आलेला आहे.  

महाराष्ट्र पक्षिमित्र संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार

नामदेवराव बहादुरे “महाराष्ट्र पक्षिमित्र, संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार -२०२५ असे पुरस्काराचे नाव असेल. हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन, जखमी पक्षी उपचार व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येईल पुरस्कार राशी रु. २५००/- , प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप राहील. हा पुरस्कार श्री. अनिल बहादुरे, नागपूर यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे.

पक्षी जनजागृती पुरस्कार

रामभाऊ शिरोडे (वाणी) स्मृती, महाराष्ट्र पक्षिमित्र, जनजागृती पुरस्कार -२०२५ असे पुरस्काराचे नाव असेल. हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, आणि त्यातून जनजागृती आणि संवर्धन असे कार्य करणाऱ्या या क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येईल. पुरस्कार राशी रु. २५००/- इतकी रक्कम व  प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप राहील. हा पुरस्कार श्री. अविनाश शिरोडे, नाशिक यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र पक्षिमित्र उदयोन्मुख पक्षिमित्र पुरस्कार

स्व. प्रकाशसिंह नारायणसिंह मोरे स्मृती ‘महाराष्ट्र पक्षिमित्र – उदयोन्मुख पक्षिमित्र पुरस्कार-२०२५ असेया पुरस्काराचे नाव असेल. हा पुरस्कार यावर्षी नव्याने सुरु करण्यात आला असून, हा पुरस्कार पक्षी अभ्यासात रुची दाखविणारे तरुण व शाळा महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी पक्षीमित्रास देण्यात येईल. पुरस्कार राशी रु. २५००/- इतकी रक्कम व  प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप राहील. हा पुरस्कार श्री. किरण मोरे, अमरावती यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे.

पक्षी साहित्य पुरस्कार

श्रीमती सुशीला पाटकर स्मृती, महाराष्ट्र पक्षिमित्र, पक्षी साहित्य पुरस्कार -२०२५ असे पुरस्काराचे नाव असेल. हा पुरस्कार पक्षी विषयक साहित्यामधीलयोगदानासाठी देण्यात येईल. प्रकाशित साहित्यामुळे पक्षीविषयक ज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी झालेली मदत व पक्षी विषयक जनजागृती मध्ये साहित्याचे योगदान याचा यामध्ये प्रामुख्याने विचार केला जाईल.  पुरस्कार राशी रु. ५०००/- इतकी रक्कम व  प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप राहील. हा पुरस्कार ॲड. चंदना साळगावकर, मुंबई यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे.


नियम आणि अटी

जीवन गौरव पुरस्कार

जीवन गौरव पुरस्कार हा एका व्यक्तीस आणि इतर पुरस्कार हे व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येतील. यासाठी पुरस्कार राशी, प्रमाणपत्र /मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप राहील. दरवर्षी प्रत्येकी एक पुरस्कार देण्यात येईल, गरज पडल्यास विभागून देण्यात येईल (जीवन गौरव सोडून). सर्व पुरस्कार त्या त्या वर्षी होणाऱ्या संमेलनात प्रदान करण्यात येतील. पुरस्कारासाठी संस्था निवड करण्यात येत असल्यास म. प. संलग्नित संस्थेस प्राधान्य देण्यात येईल. वरील पुरस्कारांसाठी स्वतः किंवा इतर व्यक्ती किंवा संस्था मार्फत प्रस्ताव सादर करता येतील. एखाद्या गटात योग्य प्रस्ताव प्राप्त न झाल्यास पुरस्कार जाहीर करण्यात येणार नाही. पुरस्कार निवडीसाठी निवड समिती कार्यकारिणी सभेत ठरविण्यात येऊन समिती प्राप्त प्रस्तावांवर सर्वंकष विचार करून पुरस्कार विजेत्यांची नावे महाराष्ट्र पक्षिमित्रकडे सादर करेल. विजेत्यांची नावे महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे जाहीर करण्यात येतील. महाराष्ट्र पक्षिमित्र कार्यकारिणीतील सदस्य किंवा त्यांचे कुटुंबीय या पुरस्कारासाठी अर्ज करू शकणार नाहीत, किंवा त्यांना पुरस्कार देण्यात येणार नाही.

पक्षी साहित्य पुरस्कार

पक्षी साहित्य पुरस्कार हा दरवर्षी एका व्यक्तीस त्यांच्या पक्षी विषयक साहित्य योगदानासाठी देण्यात येईल. साहित्य प्रकाशित स्वरूपातील असावे. साहित्यामध्ये पुस्तके, वृत्तपत्र, नियतकालिके इ मध्ये प्रकाशित लेख/ लेखमाला (गद्य, पद्य) अशा स्वरूपाच्या साहित्याचा विचार केला जाईल (ई-बुक, ब्लॉग, वेबसाईट इत्यादी वरील लिखाणाचा विचार केला जाणार नाही). प्रकाशित साहित्य हे मागील पाच वर्षातील असावे (उदा. २०२५ च्या पुरस्कारासाठी २०२० ते २०२५ या कालावधीतील असावे). प्रकाशित साहित्यामुळे पक्षीविषयक ज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी झालेली मदत व पक्षी विषयक जनजागृती मध्ये साहित्याचे योगदान याचा विचार केला जाईल. आपल्या प्रस्तावा सोबत प्रकाशित साहित्याच्या प्रत्येकी दोन प्रती पाठविणे अनिवार्य आहे.  

वरील पुरस्कारांसाठी स्वतः प्रस्ताव सादर करावा लागेल.  एखाद्या गटात योग्य प्रस्ताव प्राप्त न झाल्यास पुरस्कार जाहीर करण्यात येणार नाही. पुरस्कार निवडीसाठी निवड समिती ठरविण्यात येऊन, सदर समिती प्राप्त प्रस्तावांवर सर्वंकष विचार करून पुरस्कार विजेत्याचे नाव महाराष्ट्र पक्षिमित्रकडे सादर करेल. विजेत्यांची नावे महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे जाहीर करण्यात येतील. महाराष्ट्र पक्षिमित्र कार्यकारिणीतील सदस्य, पक्षिमित्र संपादक मंडळ मधील व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबीय या पुरस्कारासाठी अर्ज करू शकणार नाहीत, किंवा त्यांना पुरस्कार देण्यात येणार नाही.

पुरस्कारासाठी प्रस्ताव महाराष्ट्र पक्षिमित्रच्या प्रती,
कार्यवाह, महाराष्ट्र पक्षिमित्र,
व्दारा- प्रा. डॉ. गजानन वाघ, ६३,
अरण्यार्पण, समता कॉलनी, कठोरा रोड,
अमरावती ४४४६०४

या  पत्त्यावर किंवा Scan केलेला संपूर्ण प्रस्ताव PDF स्वरुपात संस्थेचा इमेल- pakshimitra@gmail.com वर पेपरलेस सुद्धा पाठविता येईल.

आपला प्रस्ताव दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्या दरम्यान पुरस्कारार्थी यांची नावे जाहीर करण्यात येतील. पुरस्कार प्राप्त व्यक्तीस निवड झाल्याचे इमेल/ पत्र किंवा फोन व्दारे कळविण्यात येऊन अगामी संमेलनाची तारीख सुद्धा कळविण्यात येईल, तसेच तारीख निश्चित झाल्यानंतर रीतसर निमंत्रण पाठविण्यात येईल.

अधिक माहितीसाठी 7030101981 or 9822875773 या क्रमांकावर संपर्क करू शकता.