महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या वतीने पाचवी महा पक्षी गणना दि. ११ जाने. २०१४ ते २६ जाने. २०१४ या कालावधीत घेण्यात आली. ही गणना प्रतिवर्षी घेण्यात येते. त्यामधुन विविध पक्ष्यांची स्थिती, धोके, आढळ इत्यादी माहिती उपलब्ध होते. या माहितीच्या आधारे संकटग्रस्त पक्षी प्रजातींसाठी संरक्षण, संवर्धन कार्यक्रम हाती घेता येणे शक्य होते. या बाबींचा विचार करता अशा प्रकारची गणना ही अत्यंत महत्वाची ठरते. या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून श्री. शरद आपटे (सांगली) यांनी काम केले.

 Read Report (PDF) मराठी | English

 View gathered data (Microsoft Excel File)

 

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या वतीने दि. १९ जाने. ते २७ जाने. २०१३ या कालावाधीत राज्यव्यापी पक्षी गणना आयोजीत करण्यात आली होती. गणनेसाठी संघटनेचे सभासद व सर्व निसर्गप्रेमींना सहभागी होण्याचे अहवान संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे व गणनेचे संयोजक व संघटनेचे सहसंघटक शरद आपटे यांनी केले होते. सगळ्या वयोगटातील लोक यात सहभागी झाले होते. नवनविन पक्षीमित्र यात सहभागी झाले ही एक आनंदाची बाब होती. या गणनेत ४९ ठिकाणांचे रिपोर्ट संघटनेकडे दाखल झाले.

 Read Report (PDF) मराठी | English

 View gathered data (Microsoft Excel File)

 

सन २०११ सालची महा पक्षी गणना २१ ते ३० जानेवारी या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आली. पक्षांची मोजदाद, त्यांची सद्य परिस्थिती या माहिती बरोबर सर्वसामान्य माणसांना पक्षीनिरीक्षणाची गोडी लागावी हा गणनेचा हेतू होता. महाराष्ट्राच्या तेरा जिल्ह्यतील ३४ तालूक्यात ही गणना संपन्न झाली. सगळ्या वयोगटातील लोक यात सहभागी झाले होते. नवनविन पक्षीमित्र यात सहभागी होत आहेत ही एक आनंदाची बाब आहे. धरणे, तलाव, समुद्र किनारे, खारफुटी, शहरे, बागा, जंगले इत्यादी विविध अधिवासात ३०८ जातींच्या एकूण ५९,३८२ पक्षांची नोंद केली गेली. या गणनेत ४ शाळांसह १५ संस्था व २०० व्यक्ती यांच्या कडून ११५ ठिकाणची गणना झाली.

 Read full report (PDF) मराठी  | English

 View gathered data (Microsoft Excel File)

 

महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे घेतल्या जाणाऱ्या महा पक्षी गणनेत २०१२ या वर्षी अपेक्षेहून जास्त लोक सहभागी होताना दिसून आले. महाराष्ट्रातील ही महा पक्षी गणना २२ ते २९ जानेवारी २०१२ यादरम्यान घेण्यात आली. वृत्तपत्रांतील जाहिरातीत दिल्या प्रमाणे सर्व स्तरातील व वयोगटातील लोक यात सहभागी झाले होते. पक्ष्यांची गणना, त्यांची सध्याची परिस्थिती व माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी व त्यांना ती आत्मसात करता यावी हा यामागचा हेतू आहे. गवताळ प्रदेश, धरणे, तलाव, समुद्रकिनारे, चिखलीय प्रदेश, खारफुटी जंगल, शहरे, बागा इत्यादी विविध अधिवासात २६६ जातींच्या एकुण १,३०,४०० पक्ष्यांची नोंद केली गेली. सर्वात जास्त पक्षी जळगांव (५९,६८८) येथे नोंदण्यात आले तर त्या पाठोपाठ सोलापुर (३०,४९६) आणि भुसावळ (२३,५८०) येथे पक्ष्यांची नोंद झाली. अशा प्रकारे जळगाव जिल्ह्यामध्ये निरनिराळ्या जातीचे १४९ पक्षी हंतुर धरणाजवळ आणि संख्येमध्ये जास्त असलेले २४,५३१ पक्षी हिप्परगा भागात आढळुन आले.

 Read Report (PDF) मराठी | English

 View gathered data (Microsoft Excel File)

 

सन २०१० सालची महा पक्षी गणना २४ ते ३१ जानेवारी या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आली. पक्षांची मोजदाद, त्यांची सद्य परिस्थिती या माहिती बरोबर सर्वसामान्य माणसांना पक्षीनिरीक्षणाची गोडी लागावी हा गणनेचा हेतू होता. गणनेसाठी संघटनेचे सभासद व सर्व निसर्गप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे व गणनेचे संयोजक व संघटनेचे सहसंघटक शरद आपटे यांनी केले. या गणनेत  संघटनेकडे  ५१ ठिकाणांचे रिपोर्ट दाखल झाले.

PDF file Read full report (PDF) मराठी | English

Microsoft Excel File View gathered data (Microsoft Excel File)